Breaking News

सिडकोतील वर्ग-1 श्रेणीतील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार , सिडको महामंडळापुढे हाती घेतलेले विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान असून यासाठी कुशल मनुष्यबळाची तत्परतेने आवश्यकता

सिडकोतील वर्ग-1 श्रेणीतील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार , सिडको महामंडळापुढे हाती घेतलेले विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान असून यासाठी कुशल मनुष्यबळाची तत्परतेने आवश्यकता

नवी मुंबई :- सिडको महामंडळाने नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विकास प्रकल्प राबवून नवी मुंबईच्या नागरिकांना एक उच्च जीवन शैलीची अनुभूती प्रदान केली आहे. पायाभूत सुविधांबरोबरच सामाजिक शैक्षणिक आरोग्य सुविधांच्या सुयोग्य नियोजनावर सिडकोने नेहमीच भर दिला आहे. याच अनुषंगाने सिडको महामंडळात कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ, सहाय्यक विधी अधिकारी इ. वर्ग-1 श्रेणीतील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

                “सिडकोचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना, नवी मुंबई मेट्रो, नैना, कॉर्पोरेट पार्क असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांद्वारे नवी मुंबईचं रूपांतर परिपूर्ण आंतरराष्ट्रीय शहरामध्ये करण्याबरोबरच शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यावर शासनाचा भर आहे. या भरती प्रक्रियेमुळे या प्रकल्पांच्या कामांना अधिक गती मिळणार आहे, त्याशिवाय सिडकोतर्फे देण्यात येणाऱ्या सेवा नवी मुंबईकरांना अधिक वेगवान व कार्यक्षमतेने मिळतील.”“सिडको महामंडळापुढे हाती घेतलेले विविध प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान असून यासाठी कुशल मनुष्यबळाची तत्परतेने आवश्यकता आहे. ह्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळातील विविध विभागातील पदांवर वर्ग-1 अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन राज्याच्या विकासाचे साक्षीदार व्हा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे.”सिडकोतर्फे वर्ग-1 श्रेणीतील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत), सहाय्यक परिवहन अभियंता, वरिष्ठ नियोजनकार, अर्थशास्त्रज्ञ आणि सहाय्यक विधी अधिकारी अशा विविध पदांची भरती करण्यात करण्यात येत आहे. सदर भरतीसंबंधीची जाहिरात वर्तमानपत्रांध्ये प्रसिद्ध झाली असून www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर “career” सेक्शन अंतर्गत विस्तृत जाहिरात, पात्रता, निकष आणि अटी व शर्ती इ. माहिती उपलब्ध असून उमेदवारांनी या संकेतस्थळास भेट द्यावी असे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे. 


Most Popular News of this Week