Breaking News

फुडलॅण्ड पुलाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुले

फुडलॅण्ड पुलाच्या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुले

पनवेल : गेल्या सहा महिन्यांपासून फुडलॅण्ड येथील रेल्वे पुलाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील दोन्ही मार्गिका सुरू करण्यात आल्याने टिआयएचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सिडकोचे आभार मानले आहेत.

           तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी नावडे रेल्वे पुलावर पडत असलेला ताण लक्षात घेता कळंबोली स्टील मार्केट फूडलॅण्ड येथून एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी सिडकोने नवीन पूल बांधला. परंतु, सद्यःस्थितीमध्ये या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे या पुलाला खड्डे पडले होते. त्यामुळे तळोजा एमआयडीसी परिसरात जाणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजवर (आरओबी) रस्ते काँक्रिटीकरणाचे काम जलदगतीने करण्यासाठी तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए) अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. अखेर सिडकोने सहा महिन्याच्या ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये दोन्ही मार्गिकिचे काम पूर्ण केल्याने तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी सिडकोचे आभार मानले आहेत.


Most Popular News of this Week