Breaking News

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जलरथाला हिरवी झेंडे दाखवून उद्घाटन..सूक्ष्म नियोजनाप्रमाणे प्रभावी उपक्रम राबवण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जलरथाला हिरवी झेंडे दाखवून उद्घाटन..सूक्ष्म नियोजनाप्रमाणे प्रभावी उपक्रम राबवण्याचे आवाहन

बुलढाणा ता. 26 आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी जलरथाचे उद्घाटन करण्यात आले. केलेल्या सूक्ष्म नियोजनाप्रमाणे सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले.

    भारतीय जैन संघटना व पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात सुरू असलेली जलरथाच्या माध्यमातून जलजागृती ही बुलढाणा जिल्ह्यातही सूक्ष्म नियोजनाप्रमाणे प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या सूक्ष्म नियोजनाप्रमाणे सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथून जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, राजेशजी देशलरा, BJS जिल्हा अध्यक्ष विनोदकुमारजी सुराणा यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय जैन संघटना आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन व जलयुक्त शिवार अभियान यांची जलरथाच्या माध्यमातून व्यापक प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात स्वतंत्र 13 जलरथ आणि त्यासोबत 

 13 समन्वयक असणार आहे. जे गावागावात जाऊन पाणी, स्वच्छता, आरोग्य, जलयुक्त शिवार याची व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्ध करणार आहेत. गावातल्या दर्शनी भागामध्ये पोस्टर, स्टिकर्स लावणार आहेत. तसेच ऑडिओ व्हिडिओ द्वारे लोकांना पाणी, स्वच्छता आणि जलयुक्त शिवार अभियानाचे धडे दिले जाणार आहेत. याचे सूक्ष्म नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी विस्ताराधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक गावात दवंडी देण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. सदर उद्घाटन समारंभाला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग राहुल जाधव, कार्यकारी अभियंता सिंचन विभाग विशाल पिंपळे, भारतीय जैन संघटनेचे राजेश देशलरा, विनोद कुमार सुराणा BJS जिल्हा अध्यक्ष, जितेंद्र कोठारी, मंगलचंद कोठारी, निलेश नहाटा, प्रदीप बेगाणी, रवी सुराणा, सर्वेश्वर चौके तसेच जिल्हा पाणी व  स्वच्छता मिशन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.


Most Popular News of this Week