Breaking News

भारतात हार्ट फेल्युअर हे मृत्यूंचे एक प्रमुख कारण बनले आहे, तब्बल ४.६ मिलियन रुग्ण भारतात , भारतातील पहिले फोर्थ जनरेशन ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर

भारतात हार्ट फेल्युअर हे मृत्यूंचे एक प्रमुख कारण बनले आहे, तब्बल ४.६ मिलियन रुग्ण भारतात , भारतातील पहिले फोर्थ जनरेशन ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर

नवी मुंबई :- भारतातील पहिले फोर्थ जनरेशन (जी४) ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर करून कार्डिओलॉजी क्षेत्रात आणखी एक गोष्ट सर्वात पहिल्यांदा करण्याचा मान अपोलो हॉस्पिटल्सने पुन्हा पटकावला आहे. अपोलो हॉस्पिटल्सचे सिनियर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि हार्ट व्हॉल्व रिप्लेसमेंट व मिट्रल व्हॉल्व प्रक्रियांचे प्रणेते डॉ साई सतीश यांनी तीन व्यक्तींवर हे मिट्रल व्हॉल्व रिपेयर्स यशस्वीपणे केले आहेत.या तीनही रुग्णांना शेवटच्या टप्प्यातील हार्ट फेल्युअरचा त्रास होत होता आणि ते भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून उपचारांसाठी आले होते. फोर्थ जनरेशन मिट्राक्लिप™ ट्रान्सकॅथेटर मिट्रल व्हॉल्व रिपेयर सिस्टिममुळे एज-टू-एज मिट्रल व्हॉल्व रिपेयर करता येते. यामध्ये डॉक्टरांना रुग्णाच्या मिट्रल व्हॉल्व ऍनाटॉमीनुसार क्लिपचा आकार निवडता येतो.नवीन लीफलेट ग्रास्पिंग तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना लीफलेट्स एकाच वेळी किंवा स्वतंत्रपणे पकडता येतात. तब्बल ४.६ मिलियन रुग्ण असल्याने आज भारतात हार्ट फेल्युअर हे मृत्यूंचे एक प्रमुख कारण बनले आहे.

                  रुग्णांविषयी अधिक तपशीलवार माहिती देताना डॉ साई सतीश म्हणाले, "पहिले रुग्ण ६९ वर्षांचे आहेत आणि त्यांना डायलेटेड कार्डिओमायोपॅथीचा त्रास होता, त्यांचे हृदय २०% पेक्षा कमी प्रमाणात कार्य करू शकत होते.२००७ साली त्यांच्यावर हार्ट फेल्युअरसाठी कार्डियाक रीसिंक्रनायझेशन थेरपी (पेसमेकर) करण्यात आली होती.हार्ट फेल्युअरसाठी आता कोणतेच उपचार लागू पडत नसल्याने आणि गंभीर मिट्रल रिगर्गीटेशनमुळे त्यांना आमच्याकडे आणले गेले. अनेक वेगवेगळ्या सह्व्याधी होत्या त्यामुळे हृदय प्रत्यारोपणासहित इतर कोणत्याही प्रकारचे सर्जिकल इंटरव्हेन्शन करणे त्यांच्याबाबतीत शक्य नव्हते.तसेच सध्या उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही साधनांच्या साहाय्याने त्यांच्यावर उपचार करता येत नव्हते. त्यांच्यावर ही प्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले, जरा देखील मिट्रल व्हॉल्व लीकेज उरले नाही.प्रक्रिया अयशस्वी झाल्याची काहीही लक्षणे दिसून आली नाहीत.रुग्णाला यशस्वी उपचारांसह घरी पाठवले गेले." दुसऱ्या रुग्ण ७३ वर्षांच्या होत्या, त्यांच्या बाबतीत अनेक आव्हाने होती, त्यांना कार्डियाक अरेस्ट होऊन गेला होता, त्यातून त्या बचावल्या आणि गंभीर प्रमाणात मिट्रल व्हॉल्व लीकमुळे आणि कार्डिओजनिक शॉकमुळे त्यांना आमच्याकडे आणले गेले होते. मेनिंगिओमासाठी त्यांची न्यूरोसर्जरी झालेली होती, सीए ब्रेस्ट ऑपरेशन झालेले होते आणि रेडिएशन थेरपी देखील त्यांनी घेतलेली होती, त्यानंतर त्या पडल्या, ज्यामध्ये त्यांचे हिप फ्रॅक्चर झाले होते.त्यांच्यावर सर्जरी करणे किंवा इतर कोणत्याही साधनाने उपचार करणे शक्य नव्हते.आम्ही त्यांच्यावर ही प्रक्रिया केली आणि त्याचे उत्तम परिणाम दिसून आले.रेसिड्युअल मिट्रल लीक अजिबात उरले नाही.आम्ही एक पेसमेकर देखील प्रत्यारोपित केला. आता या रुग्ण महिलेला कोणत्याही लक्षणांचा त्रास होत नाही आणि त्यांचे हृदय सामान्य प्रकारे कार्य करत आहे.तिसऱ्या रुग्ण ७६ वर्षांच्या आहेत. गंभीर मिट्रल रिगर्गीटेशनमुळे सातत्याने गंभीर हार्ट फेल्युअरची तक्रार घेऊन त्या आमच्याकडे आल्या होत्या. याआधी त्यांच्यावर अनेक कार्डियाक सर्जिकल इंटरव्हेन्शन्स करण्यात आली होती.  या नव्या तंत्रामुळे आम्ही त्यांच्यावर ही प्रक्रिया यशस्वीपणे करू शकलो. आता त्यांचे हृदय सामान्य प्रकारे कार्य करत आहे आणि हार्ट फेल्युअरची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांना तीन दिवसात घरी पाठवण्यात आले."


Most Popular News of this Week